शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:54 IST

मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते.

वडवणी : फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात, शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रविवारी दुपारी मयत डॉक्टर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीने चौकशी करण्याची मागणी केली.

सदरील भेटीनंतर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या प्रकरणात मयत डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसते. हा दबाव शवविच्छेदन रिपोर्टसंदर्भात होता. त्यामुळे विशेष तपास पथकाने (एसआयटी) डॉक्टरांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्व शवविच्छेदनांची चौकशी करावी, जेणेकरून त्यांच्यावर दबाव होता की नाही हे स्पष्ट होईल. दबाव आणणारे डॉक्टर, पोलिस, राजकीय नेते की सामाजिक कार्यकर्ते की इतर कोणी होते याचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांना आलेले सर्व फोन कॉल्स तपासण्याची मागणीही त्यांनी केली. या चौकशीतूनच आत्महत्येमागील खरे कारण समोर येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, तसेच शासनाने पीडित कुटुंबीयातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य आणि फलटण न्यायालयातील वकील मोरे हे या प्रकरणात कुटुंबीयांना कायदेशीर मदत करतील आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी कुटुंबासोबत राहील, असे आश्वासनही आंबेडकरांनी दिले. यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तेजस्वी सातपुतेंनी घेतली भेटदरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी शनिवारी सकाळी डॉक्टरांच्या गावी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास कुटुंबीयांना दिला आणि घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली.

बीडच्या सामाजिक सलोख्यावर आंबेडकरांची चिंताप्रकाश आंबेडकर यांनी बीड जिल्ह्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बीडमध्ये मराठा आणि वंजारी समाजातील वाद राजकीय मंडळींकडून विकोपाला नेण्याचा प्रयत्न होत आहे. जात आणि धर्माच्या आधारावर शासन काम करत आहे, हे देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी बीडमध्ये लक्ष घालून हे प्रकरण तातडीने मिटवावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pressure on doctor over autopsy report, alleges Prakash Ambedkar.

Web Summary : Prakash Ambedkar alleges pressure on deceased doctor regarding autopsy report. Demands SIT probe into all autopsies under doctor's supervision and scrutiny of phone calls. He also criticizes CM for relying on police reports and asks for government job to victim family member. He also expressed concern over social harmony in Beed.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर