शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:53 IST

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वच नगर पालिकांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी विद्यूत रोषणाई करण्याबरोबरच स्वच्छता केली आहे. तसेच ज्या मार्गांवरून मिरवणुका निघणार आहेत, त्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. तसेच महावितरणनेही सर्वत्र विद्यूत रोषणाई केली आहे. या दिवशी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकाºयांसह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांना घ्यावयाची काळजी व इतर सुचना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांकडून सूचनाजिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शांतता बैठकीत विविध सुचना केल्या. यामध्ये डीजे वाजविण्याची डेसिबल मर्यादा आणि वेळेचे पालन, शहर स्वच्छता, विद्युत पुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियमन, भेसळयुक्त पदार्थांची विक्री, अवैध दारु विक्री, महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची नियुक्ती आदींची नियूक्ती केल्याचे सांगितले. तर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांना जयंती उत्सवाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

अफवांवर विश्वास नकोसोशल मिडीयावरून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात. काही लोक कसलीही खात्री न करता आलेला मेसेज पुढे फॉरवर्ड करतात, तर काहीजण लगेच यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

जिल्ह्यात तगडा बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात विशेष पथकांसह तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी बंदोबस्तावर नियंत्रण ठेवणार असल्याचे डीएसबीचे सहायक पोलीस निरीक्षक एस.म्हेत्रेवाड व सहायक फौजदार आबा चक्रे यांनी सांगितले.

महिलांसाठी विशेष व्यवस्थामिरवणूक पाहण्यासाठी आणि सहभागी होणाºयांमध्ये महिला, तरूणांची संख्या लक्षणिय असते. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात महिलाांसाठी विशेष बंदोबस्त नेमला आहे. तसेच दामिनी पथकही नजर ठेवणार आहे. माजलगावात गस्तीबरोबरच महिला पोलीस कर्मचारी साध्या वेषांमध्ये मिरवणुकीत सहभागी होऊन गैरप्रकारांवर नजर ठेवतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीMarathwadaमराठवाडा