कोरोनाकाळातही गरोदर मातांचा तपासणीस चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:15+5:302021-07-13T04:08:15+5:30

माजलगाव : तालुक्यातील सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाकाळातही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांकडून उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Pregnant mothers also respond well to coronal screening | कोरोनाकाळातही गरोदर मातांचा तपासणीस चांगला प्रतिसाद

कोरोनाकाळातही गरोदर मातांचा तपासणीस चांगला प्रतिसाद

माजलगाव : तालुक्यातील सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाकाळातही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांकडून उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला ४० माता तपासणीस येतात, तर या ठिकाणी ८०-९० ओपीडी होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळत आहे.

माजलगाव तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सहा आरोग्य केंद्रापैकी पाथरूड येथील आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर ओपीडी होत असतात. परंतु सादोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यापूर्वी सर्वसामान्य जनतेकडून पाठ फिरवली जायची; परंतु मागील दोन-तीन वर्षात या प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार सुविधा मिळत असल्याने या ठिकाणी रुग्णांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोरोनाकाळातही या ठिकाणी दररोज ८० ते ९० ओपीडी होत आहे. आयपीडी ४-५ तर दर महिन्याला गरोदर मातांची या ठिकाणी वेगवेगळी तपासणी करण्यात येते. सध्या याठिकाणी ४० माता उपचार घेत आहेत. या मातांना या ठिकाणी दर्जेदार सुविधा व मुबलक औषधी मिळत असल्याने या भागातील गरोदर महिलांचा खासगी रुग्णालयाकडे जाण्याचा कल थांबला असल्याचे माता सांगत होत्या.

या ठिकाणी सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दत्तात्रय पारगावकर व डॉ. रमेश घुमरे काम पहात आहेत. त्यांच्याबरोबरच ज्ञानेश्वर मुळाटे, अशोक पवार, औषधी निर्माता गोविंद गोचडे, विकास नीळकंठ, नर्स म्हणून माळकरी एस. एस. वंजारे एस. बी. चवरे, एस. व्ही. लोखंडे, सुनीता दळवी, सहारे साधना, काळे, सुदाम उगले, शेख सय्यद, आशाताई व सर्व कर्मचारीवर्ग काम करत आहे.

कोरोनाकाळातही सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांकडून व गरोदर मातांकडून तपासणीस या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर औषधी उपलब्ध आहेत.

-डॉ. रमेश घुमरे, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, सादोळा

120721\img_20210709_113852_14.jpg~120721\img_20210709_113651_14.jpg

Web Title: Pregnant mothers also respond well to coronal screening