माजलगाव उपविभागात विजेचा लपंडाव - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:07+5:302021-07-13T04:08:07+5:30
माजलगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे माजलगाव उपविभागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस ...

माजलगाव उपविभागात विजेचा लपंडाव - A
माजलगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे माजलगाव उपविभागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकरी तर उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वीज वितरण कंपनीच्या माजलगाव उपविभागात माजलगाव शहरासह ९० गावे, वस्ती, तांडे येतात. या उपविभागात वीज बिल भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मागील अनेक वर्षांपासून माजलगाव शहरात लोडशेडिंग बंद आहे. परंतु, मागील एक दीड वर्षाच्या कार्यकाळात कोरोनामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. उन्हाळ्यातही या ठिकाणचा वीजपुरवठा क्वचित खंडित झाल्याने नागरिकांना उन्हाळा जाणवला नाही. एक महिन्यापासून पावसाळ्यास सुरुवात झाली. चार थेंबही आले की, दिवस दिवस वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
....
या महिन्यात वारंवार हवा व पाऊस येत असल्यामुळे वारंवार तारा तुटणे व इतर बिघाड होत आहेत. त्यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ते सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
-सी. एम. चौधरी, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, माजलगाव शहर.