विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:21+5:302021-07-11T04:23:21+5:30
सुविधांचा अभाव नेकनूर : येथील आठवडीबाजार दररविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार ...

विजेचा लपंडाव
सुविधांचा अभाव
नेकनूर : येथील आठवडीबाजार दररविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजीविक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
नियमांची ऐशीतैशी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय.
रस्ता दुरुस्त करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत अद्यापही लक्ष दिले जात नाही.
स्वच्छता होईना
माजलगाव : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून न.प.ने स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.