वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:54+5:302021-01-10T04:25:54+5:30
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील ...

वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे.
नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक वाढली
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागांत सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.