रामेवाडी तालुका परळी येथे कोंबडींचा मुत्यू बर्ड फ्लू रोगाने मृत्यू,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:51+5:302021-02-25T04:41:51+5:30
बीड : जिल्ह्यातील रामेवाडी तालुका परळी येथे कोंबडींचा बर्ड फ्लू रोगाने मृत्यू झालेले आहेत. मौजे रामेवाडीपासून १ कि.मी.च्या ...

रामेवाडी तालुका परळी येथे कोंबडींचा मुत्यू बर्ड फ्लू रोगाने मृत्यू,
बीड : जिल्ह्यातील रामेवाडी तालुका परळी येथे कोंबडींचा बर्ड फ्लू रोगाने मृत्यू झालेले आहेत. मौजे रामेवाडीपासून १ कि.मी.च्या आतील मौजे रामेवाडी, जळगव्हाण तांडा, जळगव्हाण ता.परळी हा संक्रमित क्षेत्र व १० कि.मी. परिसरातील पोहनेर, डिग्रस, रामनगर तांडा, हिवरा गोवर्धन, हिवरा वस्ती, पिंपरी बु, तेलसमुख, बोरखेड, ममदापुर, कौडगांव हुडा, कौडगांव हुडा तांडा ता.परळी व कोथाळा ता.माजलगांव या गावांना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले. या गावांतील कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा/प्रदर्शन आयोजित करणे यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. वरील सर्व गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषीत करण्यात आले आहेत.
येथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोंबडीचा मृत्यू बाबत भितीचे वातावरण निर्माण होऊ नये, आपल्या भागात १ किंवा २ कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये. सदरील मृत कावळे, कोंबडया आढळून आल्यास ग्रामपंचायत, नगरपंचायत यांचेशी व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.
मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नये. मास्क वापरावा. तसेच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जंतूकिकरण करुन घ्यावा. कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील, असेही जगताप यांनी सांगितले.