रस्त्यांवर खड्डे वाढले, दुरुस्ती काही होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:20+5:302021-02-08T04:29:20+5:30

पाटोदा : शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडत असून, दिवसेंदिवस ...

The potholes on the roads increased, no repairs were made | रस्त्यांवर खड्डे वाढले, दुरुस्ती काही होईना

रस्त्यांवर खड्डे वाढले, दुरुस्ती काही होईना

पाटोदा : शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडत असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्ती मात्र काही होत नसल्याचे दिसत आहे.

दलालांचा सुळसुळाट, सामान्यांचे हेलपाटे

वडवणी : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, वडवणी तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. तालुक्यातील नागरिकांची पिळवणूक होत आहे.

अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

बीड : शहरातील नगर रोड, बसस्थानक, धोंडीपुरा भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: नगर रोड परिसरात शासकीय कार्यालय असल्याने या परिसरात सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान, कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्ता वाहतुकीस अरुंद होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे.

जनसेवा ग्रुपतर्फे मोफत क्रिकेट किटचे वाटप

बीड : नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जनसेवा ग्रुपच्या वतीने ‘योद्धा’ क्रिकेट टीम सह अन्य दोन टीममधील सर्व खेळाडूंना मोफत किटचे वाटप शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रमेश शिंदे, हेमंत कवठेकर, प्रदीप मुजमुले, सतीश लोखंडे, धम्मदीप कोरडे, शरद ससाणे यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.

गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री सुरूच

चौसाळा : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरी भागात अगदी सहजरित्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाया करण्याची मागणी होत आहे.

सदोष वजनकाट्यांद्वारे ग्राहकांची लूट

अंबाजोगाई : चिल्लर व ठोक विक्रीच्या व्यवसायांमध्ये वापरण्यात येत असलेले बरेचसे वजनकाटे सदोष आहेत. विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व ती यंत्रणा वर्षानुवर्षे इकडे फिरकत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन व्यापारी लूट करीत आहेत.

रमाई जयंतीनिमित्त अभिवादन

बीड : त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विलास बामने, वाघमारे, रमेश वाघमारे, स्वाती धन्वे, योगेश शिंदे, हिरवे व मान्यवर उपस्थित होते.

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी

बीड : शेतकऱ्यांना सद्यस्थितीत शेतात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रात्री-बेरात्री शेतात जाऊन शेतीला पाणी द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची पाणी देण्याची सोय होईल, अशी मागणी होत आहे.

माता रमाई जयंती उत्साहात साजरी

बीड : येथील विचारवंत बहूद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयांमध्ये त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. प्रमुख पाहुणे अक्षय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रशांत पंडित, प्रल्हाद वाघमारे, पांडुरंग पंडित, दिलीप वाघमारे, किशोर पंडित, अमोल पंडित, कुणाल जाधव उपस्थित होते.

जयंती कार्यक्रमानिमित्ताने प्रतिमापूजन

बीड : शहरातील सांची बुद्धविहाराजवळ हनुमाननगर, अंकुशनगर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सचिन साळवे, ज्योती साळवे, दृष्टी साळवे, संजय सोनवणे, प्रियंका सोनवणे, सोहन सोनवणे, पिऊशा सोनवणे, प्रतिभा भागवत, विहार भागवत, विनोद वाघमोडे आदी उपस्थित होते.

Web Title: The potholes on the roads increased, no repairs were made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.