पोस्ट कोविडही घातक; रक्त गोठल्याने येतोय अटॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:22+5:302021-06-21T04:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू ...

पोस्ट कोविडही घातक; रक्त गोठल्याने येतोय अटॅक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळेच अटॅक येतो आणि रुग्णाचा जीव जात आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात २०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले असून यात अनेकांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. परंतु याची वेगळी नोंद नसल्याने आकडा समोर आला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ५२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. पैकी ८६ हजार ७७३ जण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १५३६ एवढी आहे. कोरोनात तर धोका पोहचलाच परंतु कोरोनामुक्त होऊन घरी गेल्यावरही त्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी तयार केलेली आहे. यात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु पोस्ट काेविडनंतर किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना कोणते आजार झाले, किती लोक ठणठणीत झाले, याची वेगळी नोंद जिल्हा रुग्णालयात नसल्याचे सांगण्यात आले.
...
कोरोनामुक्तीनंतर काय त्रास होतो
कोरोनामुळे रक्त गोठून अटॅक येतो. तसेच पॅरालिसिस होऊ शकतो. पायातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ होण्याची शक्यता असते. जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, ॲस्परजिलॉसिससारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. रुग्ण डिप्रेशनमध्ये जातो. घरी गेल्यावर धाप लागणे, थकवा येणे, छाती दुखणे, दम लागणे अशी लक्षणे आणि त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना धोका असतो.
कोरोनामुक्त झाल्यावर लगेच कामाला लागू नये. आराम करावा. आहार पौष्टिक असावा. पाणी भरपूर प्यावे. यामुळे गोठलेले रक्त पातळ होते. अवजड काम करू नये. ब्रीदिंग एक्झरसाईज करावी. रक्त पातळ होण्यासाठी दिलेली औषधी वेळेवर घ्यावीत. थोडाही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांना दाखवावे, दुखणे अंगावर काढू नये.
---
कोरोनामुक्त झाल्यावरही गाफील राहू नये. कोरोनामुळे रक्त गोठते, यामुळे अटॅक येतो. यात अनेकांचा जीव जात आहे. पॅरालिसिस, पायांतील वाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीही लक्षणे जाणवली तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. अंगावर दुखणे काढणे घातक ठरू शकते. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना पोस्ट कोविडनंतरही अधिक त्रास होत असल्याचे दिसते.
-डॉ. विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय, बीड.
===Photopath===
200621\20_2_bed_14_20062021_14.jpeg
===Caption===
डॉ.विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रूग्णालय बीड