मठाधिपतीच्या मोबाईलमध्ये मिळाले अश्लील फोटो, चित्रफित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:19 IST2018-01-15T00:19:18+5:302018-01-15T00:19:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी बाबा मठाचे मठाधिपती तथा भागवताचार्य वासुदेव शास्त्री याच्या मोबाईलमध्ये पीडित ...

Pornographic photos, pictures found in the abbot mobile | मठाधिपतीच्या मोबाईलमध्ये मिळाले अश्लील फोटो, चित्रफित

मठाधिपतीच्या मोबाईलमध्ये मिळाले अश्लील फोटो, चित्रफित

ठळक मुद्देउत्तर प्रदेश पोलिसांकडून कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी बाबा मठाचे मठाधिपती तथा भागवताचार्य वासुदेव शास्त्री याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलींसह यापूर्वी शिष्य म्हणून गेलेल्या ६ मुलींचे अश्लील फोटो आणि चित्रफिती उत्तर प्रदेशातील पोलिसांना तपास करताना मिळून आल्या आहेत. महाराष्ट्रातील दोन मुलींचा लैंगिक छळ केल्यावरून या मठाधिपतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.
पुणे आणि कळवा मुंबई येथील दोन युवतींच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून त्यांना हा मठाधिपती वृंदावन येथे रामायण आणि भागवत शिकविण्यासाठी घेऊन गेला. त्या ठिकाणी मोती झील परिसरात या मुलींना किरायाने खोली करून दिली आणि स्वता: घीसा महामंडळाच्या आश्रमात राहत होता. या युवतींचे चोरून अश्लील फोटो आणि चित्रफित बनवून त्यांना हा शास्त्री ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे २७ डिसेंबर रोजी समोर आले होते. त्याच्याविरूद्ध उत्तर प्रदेशातील वृंदावन जि. मथुरा या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पीडित दोन युवती आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार कलम १६४ प्रमाणे मथुरा न्यायालयात न्यायाधीशासमोर ‘इन कॅमेरा’ जवाब नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केज तालुक्यातून होत आहे.
या प्रकरणाचे तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामसिंग द्विवेदी म्हणाले, शास्त्रीच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो आणि चित्रफित आढळल्या आहेत. महिला आणि मुलींचे मोबाईल नंबरचे सिडीआर काढण्यात आले आहेत. इतर संशयितांचीही चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
या पीडित युवतींना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्यसाचे आ.संगीता ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: Pornographic photos, pictures found in the abbot mobile