शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कापसाच्या वेचणीने काळवंडली लेकरं; मजुराअभावी वेचणीची मदार शालेय विद्यार्थ्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:47 IST

आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देकापूस वेचाणी शालेय विद्यार्थ्यांवर मदार अवलंबूनमजुरांसाठी शेतक-यांची भटकंती सुरुच

बीड : आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांवरच शेतक-यांची मदार असली तरी तालुक्यातील पांढरे सोने गोळा करत असताना लेकर मात्र काळवंडली असल्याचे दिसत आहे. 

यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपासीचे क्षेत्र आहे पण झालेल्या पावसाने मोठा फटका बसला होता. सध्या उन्हाची तीव्रता जाणवत आसल्याने रानोरान कापूस मोठ्या  प्रमाणात  फुलत आहे. शेतातील पांढरे सोने घरात आणण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु आहे. आपली सर्व कामे बंद ठेवून शेतक-यांचे कुटुंबच कापूस वेचणीसाठी शेतात जात आहे. सध्या शाळेला दिवाळीच्या सुटी आसल्याने मुलेही पालकाच्या मदतीला धावली आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत आहे. मागील चार वषार्पासून पावसाअभावी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी जेरीस आला होता. त्यामुळे कुठलेच उत्पन्न मिळाले नाही.

यावर्षी पावसाने  दिलासा मिळाल्याने कपासीचे पीक ब-यापैकी हाती लागले आहे. त्यात अधूनमधून वातावरणातही बदल होण्यास सुरुवात झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. कपाशीची वेचणी सुरू झाल्यावर मजुरांची चणचण नित्याचीच झाल्याने आणि भावही योग्य मिळत नसल्याने शेतातील राडा बाहेर काढण्यासाठी मोठी लगबग सुरु झाली आहे. कापूस वेचणीसाठी आठ ते दहा रुपये भाव दिला जात असल्याने चिमुकले हात मोठ्या प्रमाणावर राबवताना दिसत आहे. शाळा सुरु होण्यास आठवडाभराचा अवधी असल्याने बच्चे कंपनीही शेतात कापूस वेचणीत रमली आहे.

उपाशीपोटी वेचणीअल्पवयीन मुलांना कामाला ठेवणे किंवा काम करून घेणे कायद्याने गुन्हा आसताना देखील आष्टी तालुक्यात मात्र पैशासाठी लेकर उपाशी पोटी कापूस गोळा करताना दिसत आहेत. बालकामगार अधिका-यांनी दखल घेऊन  योग्य कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कडा शहराध्यक्ष संदीप जावळे यांनी केली आहे.

बाजारभावही दोन हजार रुपयांनी कमी मागील वर्षी कापसाला सहा हजार रुपये भाव होता.पण यंदाच्या वर्षी मात्र बाजारपेठेत हाच कापूस ४००० ते ४२०० रुपये एवढा मिळत आहे. दोन हजार रुपयांनी भाव खाली आल्याने शेतकरी संकटात  सापडला आहे.

टॅग्स :cottonकापूस