वडवणी चिंचवण रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:48+5:302021-07-12T04:21:48+5:30
रस्त्यावर काटेरी झाडांमुळे वाहतुकीला अडथळा वडवणी : शहरापासून कवडगाव देवडीसह ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटेरी वेल, झाडे वाहतुकीस ...

वडवणी चिंचवण रस्त्यांची दुरवस्था
रस्त्यावर काटेरी झाडांमुळे वाहतुकीला अडथळा
वडवणी : शहरापासून कवडगाव देवडीसह ग्रामीण भागातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटेरी वेल, झाडे वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील काटेरी झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
सार्वजनिक प्रसाधनगृहात अस्वच्छता
वडवणी : तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी बाजारपेठत दररोज शेकडो नागरिक, व्यापारी, व्यावसायिक येत असतात. शहरातील बाजारतळ परिसरात सार्वजनिक शौचालय उभारले आहेत. मात्र, स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक, शिवाजी चौक, तसेच वर्दळीच्या परिसरात नगरपंचायतीने सार्वजनिक, शौचालय, स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
उघड्या रोहित्रामुळे धोका
वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांवर गावागावांत बसविण्यात आलेल्या रोहित्राचे दरवाजे गायब झाल्याने रोहित्र वेल झाडे याचे साम्राज्य पसरले असल्याने धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील रोहिञाची निगा चांगली ठेवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात निवारा गरजेचा
वडवणी : शहरातील बसस्थानक हे नगरपंचायतीच्या बचतगट भवनातून वाहतूक नियंत्रण कक्ष चालत आहे. या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी तासनतास उघड्यावर ताटकळत उभे राहत आहेत. निवारा, शौचालय, पाणी या सुविधा बसस्थानक परिसरात उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.