प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:43+5:302021-02-05T08:25:43+5:30
वडवणी : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. या प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ...

प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
वडवणी : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. या प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये छत गळू लागल्याने या निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती करावी किंवा नवीन प्रवासी निवारे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रानडुकरांची धास्ती
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रस्त्यावरच हातगाडे
शिरूर कासार : शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.