शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:25 IST

परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य दाखवत अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी या खुनाचा तपास अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण केला. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देटायरच्या खुणावरून लागला छडा; रिक्षातून शहराबाहेर घेऊन जात केली बेदम मारहाण

बीड / परळी : परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य दाखवत अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी या खुनाचा तपास अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण केला. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या.

परळी -अंबाजोगाई रस्त्यालगत एका हॉटेलसमोर ४० वर्षीय इसमाचा मृतदेह सकाळी वॉकला जाणाºया नागरिकांना दिसला. घाबरुन त्यांनी तात्काळ परळी शहर पोलिसांना माहिती दिली. त्याप्रमाणे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे, सहायक पो. नि. डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार यांनी घटनेचा पंचनामा केला.

या मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच मृत्यूचे कारण शोधणे पोलिसांसाठी आव्हान होते. कस्तुरे यांनी ही माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांना दिली. त्यांनी पथकासह धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. काही लोकांना विचारले असता हा मृतदेह नागनाथ मुंडे (रा. वडगाव, ता. जळकोट, जि. लातूर) यांचा असल्याचे समजले. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना देऊन बोलावण्यात आले. शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली.

सायंकाळच्या सुमारास ऋषिकेश उर्फ सचिन बंडू फड (२१), गणेश सुभाष मुंडे (२३) (दोघेही रा. कन्हेरवाडी) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कथन केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक अजित बोºहाडे, स्था. गु. शा. चे पो. नि. घनश्याम पाळवदे, पो. नि. उमेश कस्तुरे, दरोडाचे सपोनि गजानन जाधव, डोंगरे, पो. उप नि. वाघमारे, सचिन सानप, भास्कर केंद्रे, नागरगोजे, पवार, बांगर, तोटेवाड, बुट्टे आदींनी केली.अशी घडली घटनानागनाथ मुंडे हे उदगीर येथे आऊटपोस्टवर कार्यरत होते. सुटी संपवून ते पुन्हा रुजू होण्यासाठी २२ जून रोजी परळी येथे आले. २३ तारखेला रात्री ८.३० वाजेपर्यंत ते परळीत होते. त्यानंतर ते बसस्थानक परिसरात गेले. तेथून रेल्वेस्थानकात जाण्यासाठी गणेश व सचिनच्या रिक्षामध्ये ते बसले.रेल्वे स्थानकात सोडण्यास त्यांनी सांगितले. परंतु बाजूलाच रेल्वेस्थानक असल्याने त्यांनी नकार दिला. यावर परस्परांमध्ये बाचाबाची झाली.  याचाच राग मनात धरुन आरोपींनी मुंडे यांना रिक्षातून अंबाजोगाई रोडवर नेले. तेथे त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तसेच सोडून आरोपींनी पलायन केले.

पंचनामा करतेवेळी आरोपी घटनास्थळीचपरळी शहर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत होते. यावेळी जमलेल्या गर्दीमध्ये दोघेही आरोपी तेथेच होते. कर्मचारी बांगर यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्या बोलण्यामध्ये भीती दिसली. परंतु त्यांना त्या वेळेस जास्त संशय बळावला नाही. तपासानंतर या दोघांची नावे निष्पन्न होताच बांगर यांनी घडलेला प्रकार सांगितला.

टायरच्या खुणा ठरल्या तपासाचा केंद्रबिंदूमारेकºयांनी घटनास्थळी कसलाच पुरावा ठेवलेला नव्हता. बोºहाडे यांनी पाहणी केली असता त्यांना रिक्षाच्या टायरच्या खुणा आढळून आले. त्याप्रमाणे त्यांनी रात्री चालणाºया सर्व रिक्षांची चौकशी केली असता गणेश व सचिनबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनाही कन्हेरवाडी परिसरातील एका डोंगरातून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

दोघेही अट्टल गुन्हेगारसचिन व गणेश हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. रेल्वे स्थानकात जाऊन चोरी, मारामारी असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. मुंडे यांनाही स्थानकात मारहाण करुन त्यांना लुटण्यासाठी अंबाजोगाई रोडवर नेले होते. परंतु त्यांच्या खिशात काहीच न सापडल्याने व मुंडे यांच्याकडून शिवीगाळ झाल्याचा राग मनात धरुन त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा