धारूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या ३६ जागांसाठी आज मतदान यंञणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST2021-01-15T04:27:41+5:302021-01-15T04:27:41+5:30
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतचे निवडणुका होत आहे. यापैकी कोथींबीरवाडी ही ग्रामपंचायत पूर्ण बिनविरोध निवड झाली आहे. जहागीरमोहा ग्रामपंचायतचे तीन जागा ...

धारूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतच्या ३६ जागांसाठी आज मतदान यंञणा सज्ज
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतचे निवडणुका होत आहे. यापैकी कोथींबीरवाडी ही ग्रामपंचायत पूर्ण बिनविरोध निवड झाली आहे. जहागीरमोहा ग्रामपंचायतचे तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. रुईधारूर, जहागीरमोहा, कासारी व भोपा या चार ग्रामपंचायतचे ३६ जागा ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ५२ महिला उमेदवार आहेत. १३ मतदान केंद्द असून ८६६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चार अधिकारी व ८८ कर्मचारी नियूक्त करण्यात आली. सुरक्षिततेसाठी २३ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जहागीरमोहा, कासारी हे दोन गावे संवेदनशील आहेत. प्रशासकीय यंत्रणा सर्व दक्षता ठेवून असून तहसीलदार वंदना शिडोळकर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, पोलीस निरीक्षक सुरेखा धस हे या सर्व यंञणा मतदान केंद्रापर्यंत रवाना करण्यासाठी तहसील कार्यालयात सर्व यंञणेवर लक्ष ठेवून होते.