शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत राजकारण पेटले; धस, आजबेनंतर धोंडेंची पत्रकार परिषद; दोघांनाही दिला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 19:45 IST

दोन्ही आमदार धस,आजबेंनी एकमेकांवर आगपाखड न करता योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी आमदार धोंडे यांनी केले 

कडा (बीड): गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आष्टी तालुक्यातील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेवरून आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे एकमेकांवर आगपाखड करत आहेत. दोघेही एकमेकांवर जोरदार टिका करत आहेत. आता या वादात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी उडी घेत दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. तुझमाझं करण्याऐवजी ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धोंडे यांनी केले. 

आजीमाजी आमदारांच्या पत्रकार परिषदांनी आष्टी तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, भाजप आमदार सुरेश धस यांनी तब्बल ७० गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला आहे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र आ.धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या कामासाठी १५०० कोटी रुपये उपसा जलसिंचन योजनामधून मंजूर झाले होते. मात्र, सुरेश धस यांनी पत्र दिल्याने कामाला स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोप आजबे यांनी केला होता.

यानंतर रविवारी सायंकाळी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत थेट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना निविदा काढताच येत नाही. मात्र, अशी निविदा काढून जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेची फसवणूक  केल्याचा आरोप धस यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री म्हणून पाटील यांनी खोटेनाटे काम केले. खोटी निविदा काढली. प्रेशराईज केले. त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे, असा इशारा देखील धस यांनी दिला. तसेच आमदार बाळासाहेब आजबे यांचे अडीज वर्ष केवळ माझ्यावर तोंडसुख घेण्यात गेले, अशी जोरदार दिका देखील धस यांनी केली. 

माजी आमदार धोंडे यांची उडी या दोघांच्याही पत्रकार परिषेद होताच आज माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धस, आजबे या दोन्ही आमदारांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. दोन्ही आमदारांनी एकमेकांवर  टिका करू नये, तुझमाझं करण्याऐवजी ही महत्वाची योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन धोंडे यांनी केले. तसेच या योजनेसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे देखील धोंडे म्हणाले. 

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSuresh Dhasसुरेश धस