राजकारणाला 'सोशल टच'
By Admin | Updated: October 22, 2015 21:05 IST2015-10-22T21:05:39+5:302015-10-22T21:05:39+5:30
महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा.

राजकारणाला 'सोशल टच'
महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा.
- स्मिता दिलीप धूत, माजी नगराध्यक्षा बीड : समाजकारणातून राजकारणाकडे वळालेली उदाहरणे अनेक ठिकाणी मिळतील. परंतु राजकारणातून समाजकारणाकडे पाऊल ठेवणारे मोजकेच असतात. यामध्ये बीडच्या माजी नगराध्यक्षा स्मिता दिलीप धूत यांचा उल्लेख करावा लागेल. राजकीय कर्तृत्व गाजवल्यानंतर त्या आता पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
स्मिता धूत यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झालेले आहे. राजकारणाचा त्यांचा थेट संबंध नव्हता. मात्र, त्यांचे पती व राज्य पर्यटन महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत यांच्यामुळे त्या राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेल्या. १९९५ चा काळ शिवसेनेचा होता. पालिका निवडणुकीत स्मिता धूत यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि ज्या वार्डात त्यांचे घर नव्हते की नातेवाईकही नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवली. विक्रमी मते घेऊन त्या पालिकेत सदस्य म्हणून गेल्या. १९९७-९८ दरम्यान माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून त्यांनी राजकीय कसब दाखवत विविध विकास कामे खेचून आणली. सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, जिल्हा स्टेडियमची मुहूर्तमेढत्यांच्याच काळात रोवली गेली. खासबागचे सुशोभिकरण, सिग्नल, अद्यावत रूग्णसेवा, वीज, पाणी, रस्ते आदी प्रश्न त्यांनी मार्गी लावले. माजलगाव बॅक वॉटरचे पाणी मिळण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. गोरगरीबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा त्यांना जपला आहे. गरजूंना मदतीसाठी त्या तत्पर असतात. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभही त्यांनी मिळवून दिला आहे.