शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

राहुल आवारेच्या सत्कारात रंगला राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 19:51 IST

. राहुलवर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. नागरी सत्कार सोहळ्यात माजी मंत्री सुरेश धस आणि आ. भीमराव धोंडे यांच्या टोलेबाजीचा आखाडाही चांगलाच रंगला.

पाटोदा (बीड ) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील देशाचा सुवर्णमल्ल आणी पाटोद्याचा भूमिपुत्र राहुल आवारे याचे मायभूमीत जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. शहराच्या प्रमुख रस्त्यावरून रथामधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मिरवणूक रस्त्यावर दारोदार रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राहुलवर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. नागरी सत्कार सोहळ्यात माजी मंत्री सुरेश धस आणि आ. भीमराव धोंडे यांच्या टोलेबाजीचा आखाडाही चांगलाच रंगला.

राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुलचा जन्मभूमीत जंगी सत्कार करण्याचा निर्णय झाल्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली. काही राजकारण्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याच्या वल्गना केल्या प्रत्यक्षात नागरी सत्कार समितीने नियोजित केल्यानुसार रथामधून टोलेजंग मिरवणूक काढण्यात आली. राहुल कुस्तीची बाराखडी शिकलेल्या हनुमान व्यायाम शाळेपासून मिरवणूक निघाली चार तासानंतर नगरपंचायत समोर मैदानात  नागरी सत्कार झाला. 

व्यासपीठावर कुस्तीक्षेत्रातील नामवंत काकासाहेब पवार, हरियाणाचे रणधीरसिंग केंँगाल, पंढरीनाथ पठारे, गोविंद पवार, राजाभाऊ कोळी, अक्षय शिंदे, सईद चाउस, अतुल पाटील, राजाभाऊ देवकाते, गोकुळ आवारे,  राधाताई महाराज, रामकृष्ण रंधवे महाराज, महेंद्र गर्जे, एल. आर. जाधव मधुकर गर्जे उपस्थित होते.

बक्षीस अन् अभिनंदनाचा वर्षावराहुल यास खंबीरपणे पाठिंबा देणारे पंढरीनाथ पठारे यांनी राहुलने आॅलिंपिक पदक जिंकल्यास पुण्यामधे थ्री बीएचके फ्लॅट देण्याची ग्वाही दिली. माजी मंत्री सुरेश धस यांनी आॅलिंपिकपर्यंत प्रतिमहा ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. आ. भीमराव धोंडे यांनी एकरकमी एक लाख रुपये आणि मुख्यमंत्र्यांकडून आणखी ५० लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले. उपस्थितांनी रोख बक्षिसे यावेळी दिली.

राजकीय टोलेबाजीया सत्काराच्या निमित्ताने विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुरेश धस आणी त्यांचे कट्टर विरोधक आ. भीमराव धोंडे यांनी एकमेकांचे चांगलेच चिमटे काढले. धस यांनी  कुस्तीपटूंना राजाश्रय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मागच्या लोकसभेला पूर्वीच्या पक्षाला उमेदवार नव्हता. मला उभे केले. आता मला भाजपकडून उभे केले आहे. काय होईल हे २४ तारखेला कळेल. पण ‘जिथे कुणीच नाही (उमेदवार) तिथं मी’ असं सध्या राजकीय गणित झालं आहे, असे वक्तव्य धस यांनी केले.तर  धोंडे यांनी शेलक्या शब्दांत धस यांना टोले लगावले. ते म्हणाले, सुरेश धस आता आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी माझा कधीच प्रचार केला नाही. मागचं सर्व मिटलं आणि फिटलं. आता मी धस ‘यांचाच’ प्रचार करणार, अशी ग्वाही दिली. 

गुरुंच्या मार्गदर्शनामुळे उभा राहिलो

दहा वर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय कुस्ती जिंकण्याची पात्रता होती. मात्र दिल्ली, हरियाणावाल्यांनी अन्याय केला. संघर्ष चालू असताना मधल्या काळात कुस्ती सोडण्याचा विचार आला. मात्र, गुरुंच्या मार्गदर्शनामुळे नव्या उमेदीने उभा राहिलो. गावकऱ्यांनी केलेल्या प्रेमाचा आणि बक्षिसे यांचा वर्षाव वाया जाऊ देणार नाही. आॅलिंपिक जिंकून उतराई होण्याचा प्रयत्न करील. या मातीत मोठी गुणवत्ता आहे. येथे भव्य क्रीडांगण उभारून खेळाडूंना संधी द्या. येथून शेकडो राहुल तयार होतील, असा आशावाद व्यक्त केला.

टॅग्स :Sportsक्रीडाBeedबीडCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८