निधीतून पोलीस पाल्यांचे ‘कल्याण’; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ठरतेय लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:22 IST2018-02-21T00:22:06+5:302018-02-21T00:22:23+5:30
पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लावून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ‘कल्याण’ करण्यात बीड पोलीस दलाला यश येत आहे. ‘पोलीस कल्याण निधी’तून उच्च शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीसह कर्ज व इतर योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच इतर योजनांचाही पुरेपुर लाभ दिला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

निधीतून पोलीस पाल्यांचे ‘कल्याण’; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ठरतेय लाभदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लावून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ‘कल्याण’ करण्यात बीड पोलीस दलाला यश येत आहे. ‘पोलीस कल्याण निधी’तून उच्च शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीसह कर्ज व इतर योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच इतर योजनांचाही पुरेपुर लाभ दिला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पोलीस दलातील शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कल्याण निधीचे सभासद असलेले लिपीक वर्गीय अधिकारी, कर्मचारी यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन योजनेतून २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. आतार्यंत १६ लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे.
ज्यांना पैशांची अडचण आहे, त्यांना कर्जस्वरूपात ५० हजार रुपये कर्जही दिले जात असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत ३३ लोकांना १५ लाख ७८ हजार ३०० रुपये शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती, कर्जाबरोबरच ११८ लाभार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता आणि वर्गानुसार २ लाख ५९ हजार रुपयांचे पुस्तक अनुदान दिले आहे. १४४ मुलींकरीता दप्तर योजनेतून ७२ हजार रूपये वाटप केले. ६ लोकांना ७२ हजार रूपयांचे अंत्यविधी अनुदान देण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस कल्याण निधी सध्या पोलीस पाल्यांना शिक्षणासाठी मोठा हातभार लावत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांचे याकडे विशेष लक्ष असते.