शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

पोलीस बंदोबस्तात बार्शी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:12 AM

बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली.

ठळक मुद्दे५० अतिक्रमणे हटविले। बीड न.प.च्या स्वच्छता विभागाची कारवाई

बीड : बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. दिवसभरात ५० अतिक्रमणे हटवली.‘बीड शहरात अतिक्रमणांचा पुन्हा विळखा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पालिका खडबडून जागी झाली. पोलिसांकडून बंदोबस्त मिळताच संपूर्ण यंत्रणा अतिक्रमणे हटविण्यासाठी रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनपर्यंतची जवळपास ५० अतिक्रमणांवर हातोडा फिरविण्यात आला. यामध्ये दोन टपऱ्याही जप्त करण्यात आल्या. काही लोकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. या मोहिमेत मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, प्रशांत ओव्हाळ, राजु वंजारे, महादेव गायकवाड, मुन्ना गायकवाड यांच्यासह १०० कर्मचारी, ८ ट्रॅक्टर, १ जेसीबी असा फौजफाटा होता. बंदोबस्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

टॅग्स :BeedबीडEnchroachmentअतिक्रमण