सिरसाळा ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:05 IST2021-02-28T05:05:16+5:302021-02-28T05:05:16+5:30

तुळशीराम परतवाड असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिरसाळा येथील सांगळे चौकातील एका स्वीट होमवर ...

Police officer beaten in Sirsala police station | सिरसाळा ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

सिरसाळा ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

तुळशीराम परतवाड असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिरसाळा येथील सांगळे चौकातील एका स्वीट होमवर वाद सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर परतवाड व अन्य दोघे घटनास्थळी गेले. दरम्यान, त्याठिकाणी विटा (ता. सोनपेट, जि. परभणी) येथील काहीजण दारू पिऊन भांडण करत होते. पोलिसांनी भांडण सोडवले व दोन्ही गटातील लोकांना ठाण्यात आणले. याची माहिती मिळताच विटा येथील जगन्नाथ कोलते, फेरोज पठाण, अमोल भोसले हे सिरसाळा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस कर्मचारी परतवाड यांना ‘तू आमच्या लोकांना मदत का केली नाही?’ असे म्हणत मारहाण केली. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल करून चौकशीनंतर जगन्नाथ कोलते, फेरोज पठाण व अमोल भोसले या तिघांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण व अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करीत आहेत.

Web Title: Police officer beaten in Sirsala police station