हिंगोली जिल्ह्यातून मुलीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:59+5:302021-06-02T04:25:59+5:30
हिंगोली येथून एका अल्पवयीन मुलीचे २९ मे रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ...

हिंगोली जिल्ह्यातून मुलीचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात
हिंगोली येथून एका अल्पवयीन मुलीचे २९ मे रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गोहाडे हे संशयिताचे मोबाईल लोकेशन व व कॉल डिटेल्स याच्या आधारे बीड जिल्ह्यातील केज येथे आले. यावेळी त्यांनी अल्पवयीन मुलगी व तिचे अपहरण करणारा संशयित तालुक्यातील काशीदवाडी येथे असल्याची खात्री पटविली. उपनिरीक्षक एस. टी. गोहाडे व पोलीस नाईक चव्हाण यांनी केज पोलिसांच्या मदतीने काशीदवाडी येथून भरत थोरात (रा. मांगवडगाव, मूळ गाव ढाकेफळ,ता. केज ) यास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले आहे. हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गोहाडे हे पुढील तपास करत आहेत.