नोटांच्या संशयावरून पोलिसांची धांदल
By Admin | Updated: December 22, 2016 23:17 IST2016-12-22T23:15:28+5:302016-12-22T23:17:09+5:30
आष्टी : मालवाहू ट्रकमधून दोन हजार व पाचशे रूपयांच्या नव्या बेहिशोबी नोटा नेला जात असल्याची माहिती गुरूवारी येथील पोलिसांना मिळाली.

नोटांच्या संशयावरून पोलिसांची धांदल
आष्टी : मालवाहू ट्रकमधून दोन हजार व पाचशे रूपयांच्या नव्या बेहिशोबी नोटा नेला जात असल्याची माहिती गुरूवारी येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी ठाण्याबाहेरच राज्य रस्त्यावर नाकांबदी करून ट्रक पकडला. त्यातील शेकडो गोण्या उतरवून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, नोटा आढळल्या नाहीत त्यामुळे पोलिसांची नाहक भंबेरी उडाली.
विशाखापट्टणम् येथून एपी ३७ टी ९५९९ या मालवाहू ट्रकमधून प्लॅस्टिकचा कच्चा माल अहमदनगरकडे नेला जात होता. सकाळी ८ वाजता निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना फोनवरून ट्रकमध्ये नोटा असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी दहा हमाल कामाला लावून गोण्या उतरवून झडती घेतली. मात्र, हाती काहीच लागले नाही. उलट पोलिसांना चार हजार रूपये हमाली खर्च मोजावा लागला. (वार्ताहर)