शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:47 PM

चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चोरी प्रकरणातील तपासात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजूच्या रस्त्यावर केली.शंकर राठोड (रा.बीड) असे लाच घेणाºया हवालदाराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयातून पेनड्राईव्ह चोरी झाला होता. यात एका वकिलाला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने कोठडीही दिली होती. याच प्रकरणात त्याचा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी राठोड यांनी संबंधिताकडे दहा हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने राठोड यांना लाच न देता थेट जालना गाठले आणि तेथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली. २ तारखेला तक्रार देताच टीम दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होती.शनिवारी दुपारीच राठोड यांनी दहा हजार रूपये मागितले. ही लाच शिवाजीनगर ठाण्याच्या बाजूला असणाºया एका रूग्णालयासमोर घेण्याचे ठरले. तक्रारदाराकडून १० हजारांची रक्कम स्विकारताच एसीबीने झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. राठोड यांना रात्री उशिरा बीडच्या एसीबी कार्यालयात बसविले होते. गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.जालना टिमने केली कारवाईतक्रारदाराने बीडमध्ये तक्रार न देता जालना येथील कार्यालयात दिली. दोन दिवस वॉच ठेवल्यानंतर शनिवारी सायंकाळी राठोड त्यांच्या जाळ्यात अडकले. जालना कार्यालयातील टिम बीडकार्यालयात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होती.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग