अमानुष मारहाण करून आईचा खून करणारा पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:06+5:302021-06-22T04:23:06+5:30
फिर्याद देण्यासाठी कुणीच नातेवाईक न आल्याने पोलीसच फिर्यादी झाले. सदरील आरोपीस अटक केल्यानंतर शिरूर कोर्टात सोमवारी हजर केले असता ...

अमानुष मारहाण करून आईचा खून करणारा पोलीस कोठडीत
फिर्याद देण्यासाठी कुणीच नातेवाईक न आल्याने पोलीसच फिर्यादी झाले. सदरील आरोपीस अटक केल्यानंतर शिरूर कोर्टात सोमवारी हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर याने आई शाहूबाई त्र्यंबक व वडील त्र्यंबक खेडकर यांना शनिवारी साडेचारच्या सुमारास काठीने अमानुष मारहाण केली होती. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने नगरला खाजगी दवाखान्यात पाठवले होते. मात्र, उपचारादरम्यान आई शाहूबाई यांचा मृत्यू झाला, तर वडील त्र्यंबक खेडकर हे अत्यवस्थ असल्याने उपचार घेत आहेत. घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी पारगावला जाऊन त्या आरोपीस रविवारी ताब्यात घेतले. रात्री उशिरा बीट अंमलदार भागवत सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा र.नं.७९/२०२१ कलम ३०२, ३०७, ३२३ प्रमाणे नोंद केला. पुढील तपास पो.नि. सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे करत आहेत.