शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उस दराबाबत माजलगावच्या आमदारांच्या घरावर निघालेला शेतक-यांचा मोर्चा पोलीसांनी अडवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:40 IST

तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देउस उत्पादक शेतक-यांचे मागील काही दिवसांपासून वाढीव उस दराबाबत आंदोलन सुरु आहे. माजलगाव विधानसभेचे आमदार आर. टी. देशमुख यांनी साखर संचालकांना उस दराबाबत चर्चा करावी असे शेतक-यांची मागणी आहे.

माजलगाव (बीड) : तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा आमदारांच्या निवास स्थानाकडे जात असतानाचा रोखला व आंदोलक शेतक-यांना ताब्यात घेतले. 

तालुक्यातील उस उत्पादक शेतक-यांचे मागील काही दिवसांपासून वाढीव उस दराबाबत आंदोलन सुरु आहे. याबाबत मंगळवारी शहरातील बाजारसमिती आवारात सर्व पक्षीय नेते व शेतक-यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी माजलगाव विधानसभेचे आमदार आर. टी. देशमुख यांनी साखर संचालकांना उस दराबाबत चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, आमदार देशमुख याबाबत काहीच भूमिका मांडत नसल्याने शेतक-यांनी त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरवले. यानुसार आज सकाळी सर्व शेतकरी मोर्चासाठी बाजार समितीच्या  आवारात जमले. तेथून ते आमदार निवासस्थानाकडे जात असतानाच त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला व आंदोलक शेतक-यांना त्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आमदार देशमुख यांनी साखरसंचालक पुणे यांची भेट घेवून त्यांच्याकडे शेतक-यांचे मागणी मांडली असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

आमदार दिशाभूल करत आहेतआमदार देशमुख यांच्याकडुन शेतक.यांच्या प्रश्नाची सोडवणुक होत नसल्यामुळे त्यांना थेट जाब विचारण्यासाठी आम्ही मोर्चा घेवून जात होतो. मात्र, त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत पोलीस बळाचा वापर करत आम्हाला रोकले असले तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाही. - भाई गंगाभिषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती  

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी