शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:21 AM

बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात  अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरासाठी श्रमदान का करू नय ? वर्षातील ३६५ ...

बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात  अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरासाठी श्रमदान का करू नय ? वर्षातील ३६५ दिवसांपैकी एक दिवस आपल्या बीड शहरासाठी म्हणजे आपल्यासाठी दया. सामाजिक कार्यात बीडकर कोठेही कमी नाही, हे दाखवून देण्याची संधी ३१ मे रोजी बिंंदुसरा नदी स्वच्छ अभियानातून मिळत आहे. या महाअभियानात प्रत्येक बीडकर सहभागी झाला पाहिजे, अशी अपेक्षा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

मागील काही दिवसांमध्ये देश व राज्य पातळीवर स्वच्छ महानगर व स्वच्छ शहर म्हणून देश आणि राज्यातील काही शहरांचा उत्कृष्ट शहर म्हणून गौरव करण्यात आला. या उत्कृष्ट व स्वच्छ शहरांच्या यादीत बीड शहराचा नंबर का येऊ शकत नाही, असा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. या दृष्टीने आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी. मागील वर्षी ३० जून रोजी बीड शहर स्वच्छ करण्याचा केलेला संकल्प शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास नेला. बीड शहराला दोन भागात विभागणारी बिंंदुसरा नदी हे आपल्या बीडकरांचे भूषण आहे. शहरातून जाणाऱ्या या नदीचा परिसर शहरासाठी सुंदर असावा, या हेतूने महास्वच्छता अभियान हाती घेतले आहे.

बिंंदुसरा नदीच्या पात्रामध्ये कोणीही कोणतीही घाण, कचरा, टाकाऊ वस्तू टाकून देतात. प्लास्टिक पासून ते अनेक छोट्या मोठ्या वस्तू फेकल्या जातात. झाडे, झुडपे, घाण मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. घाणीचे साम्राज्य नदी परिसरात पहावयास मिळते. ही नदी विद्रूप झालेली दिसते. महापुराच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पशुधनाची हानी, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. या बाबी लक्षात घेतल्यास नदी स्वच्छता करणे हाच एकमेव पर्याय आहे.सकारात्मक राजकारण करावेएकमेकांवर काहीच न करता आरोप प्रत्यारोप करणे, गलिच्छ राजकारण करणे, चांगल्या कामात अडथळे आणणे, एखाद्याची निंंदा नालस्ती करणे यापेक्षा सकारात्मक राजकारण करावे आणि काम करत राहावे हाच आपला विचार राहिलेला आहे. त्यामुळे आपल्या बीडसाठी सर्वांनी एक दिवस देवून स्वच्छता अभियानात सहभागी होण्याीच गरज आहे. ३१ मे रोजी सकाळी ७ वाजता बिंंदुसरा नदीपात्रात जमा व्हावे तसेच महास्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. मेटे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडBindusara Damबिंदुसरा धरणMarathwadaमराठवाडाriverनदी