ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:04+5:302021-07-21T04:23:04+5:30
कमकुवत तारा, खांबामुळे धोका अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
कमकुवत तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या आहेत, तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील जीर्ण झालेल्या तारा व खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
कोरोना नियमांची होतेय पायमल्ली
बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. नागरिकांनी मास्क लावून गरज असेल तरच फिरावे, असे आवाहन केले जात आहे.
अवैध वाळू उपशावर नियंत्रण दिसेना
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.