ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:14+5:302021-07-07T04:42:14+5:30
जीर्ण तारा, खांबामुळे धोका अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा जीर्ण झाल्या ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
जीर्ण तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा जीर्ण झाल्या आहेत. तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले खांब वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
नेकनुरातील नदीपात्रांतून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाळूचा उपसा बंदची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तरीही याकडे अद्याप लक्ष दिले जात नाही.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : ग्रामीण भागात तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.
निवाऱ्यांची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
बीड : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.