गतिरोधकाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:34 IST2021-05-19T04:34:41+5:302021-05-19T04:34:41+5:30

रस्त्याची दुरवस्था केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास ...

The plight of the brakes | गतिरोधकाची दुर्दशा

गतिरोधकाची दुर्दशा

रस्त्याची दुरवस्था

केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती आहे.

कारवाईची मागणी

माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांना त्याचा त्रास होत आहे. वाहनधारक मोठे हॉर्न वाजवत असल्याने याचा नागरिकांना, रुग्णांना त्रास होत आहे. कारवाईची मागणी आहे.

सर्वसामान्यांची लूट

अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने, सर्वसामान्यांना मात्र याचा फटका बसत आहे. याला आवर घालण्याची मागणी होत आहे.

‘जैविक’चा धोका

अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: The plight of the brakes