शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:48 IST

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा; याप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

- नितीन कांबळे/अविनाश कदम कडा/आष्टी : शहरातील संभाजीनगर भागातून भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या मोठा साठा पोलिसांनी धाड टाकून हस्तगत करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरूवारी दोघाजणांवर आष्टी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळीसाठी लागणारे साहित्य, दोन वाहने असा एकूण ८ लाख ९१ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा आहे. याचे गांभीर्य ओळखून आष्टी पोलिसांनी बुधवारी रात्री आष्टी शहरातील संभाजीनगर येथे एका ठिकाणी धाड टाकली. यावेळी भेसळयुक्त दुध बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या १३२ गोण्या, २२० तेलाचे डब्बे आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य आणि दोन वाहने असा एकूण ८ लाख ९१ हजार ३७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सय्यद इम्रान हश्मी यांच्या फिर्यादीवरून नंदु भागवत मेमाणे, जंगदबा मिल्क अॅन्ड प्राॅडकटचे मालक सतिश नागनाथ शिंदे यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नंदु मेमाणे याला ताब्यात घेतले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,  अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे,  पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, दत्तात्रय टकले, स्वाती मुंडे, सचिन कोळेकर, प्रवीण क्षीरसागर, अमोल ढवळे बब्रुवान  वाणी,भरत गुजर ,शिवप्रकाश तवले,आकाश आडागळे, सचिन पवळ, रियाज पठाण, जिजा आरेकर ,अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सय्यद इम्रान हश्मी, नमुना साहाय्यक शेख मुक्तार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड