केज रोटरीने राबवला वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:43+5:302021-07-04T04:22:43+5:30
केज शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेली वडांची झाडे हे शहराचे भूषण होते. मात्र महामार्ग रस्त्याच्या विस्तारिकरण विकास कामात ही ...

केज रोटरीने राबवला वृक्षारोपण कार्यक्रम
केज शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेली वडांची झाडे हे शहराचे भूषण होते. मात्र महामार्ग रस्त्याच्या विस्तारिकरण विकास कामात ही सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. शहराला वडांच्या झाडाचे गतवैभव मिळवून देण्याचा केज रोटरीचा संकल्प असून, काम पूर्ण झालेल्या शहरअंतर्गत महामार्गाच्या उत्तरेकडील विश्रामगृह, न्यायालय, पंचायत समिती, फलोत्पादन जागेच्या बाजूने शंभर फुटांवर एक याप्रमाणे वडांची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यातील पहिल्या पन्नास झाडांचा पहिला टप्पा लागवड एक जुलैरोजी सुरू करण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण व सचिव अरुण अंजान यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक-अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन भीमराव लोखंडे, उपप्रांतपाल दादाराव जमाले-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी युवा कार्यकर्ते अमर पाटील यांची उपस्थिती होती.
030721\img-20210703-wa0009.jpg
रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने वृक्षारोपण करताना रोटरी क्लब ऑफ केजचे अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन भीमराव लोखंडे, उपप्रांतपाल दादाराव जमाले पाटील आदी.