कचऱ्याचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:58+5:302021-02-05T08:25:58+5:30
श्वानांचा बंदोबस्त करा बीड : शहरातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. हे भटके श्वान टोळक्याने बसत असल्याने ...

कचऱ्याचे ढिगारे
श्वानांचा बंदोबस्त करा
बीड : शहरातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. हे भटके श्वान टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांवर हल्ला चढवतात. यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. बंदोबस्ताची मागणी आहे.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.