फार्मासिस्ट हे कोरोनातील पडद्यामागचे हीरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST2021-09-26T04:36:25+5:302021-09-26T04:36:25+5:30
बीड : कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका व इतर वर्गांनी काम केले. त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून संबोधले. यात फार्मासिस्टही कमी ...

फार्मासिस्ट हे कोरोनातील पडद्यामागचे हीरो
बीड : कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका व इतर वर्गांनी काम केले. त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून संबोधले. यात फार्मासिस्टही कमी नाहीत; परंतु त्यांचे नाव समोर आलेले नाही. असे असले तरी या महामारीत पडद्यामागचे खरे हीरो म्हणून फार्मासिस्टची भूमिका असून, त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले.
फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने बीडमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व फार्मासिस्टना आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच सर्वांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, औषध निरीक्षक व्ही. दुसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष योगेश जोशी यांच्यासह इतर फार्मासिस्ट महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अनेकांनी समस्या मांडल्या, तर काहींनी मागण्या मान्य होत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रास्ताविक प्रिया शाईवाले, सूत्रसंचालन गाेविंद गोचडे यांनी केले, तर आभार महादेव पवार यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व खाजगी, शासकीय पदावरील फार्मासिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
250921\25_2_bed_24_25092021_14.jpeg
बीडमध्ये फार्मासिस्ट डे निमित्त सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, डॉ.सुखदेव राठोड, औषध निर्माण अधिकारी व्ही.दुसाने आदींची उपस्थिती होती.