शैक्षणिक अभ्यासक्रम व शेती मशागतीसाठी दिली मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:34+5:302021-03-27T04:34:34+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : लॉकडाऊनच्या आदेशात अंशत बदल बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू ...

Permission granted for educational courses and agricultural cultivation | शैक्षणिक अभ्यासक्रम व शेती मशागतीसाठी दिली मुभा

शैक्षणिक अभ्यासक्रम व शेती मशागतीसाठी दिली मुभा

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : लॉकडाऊनच्या आदेशात अंशत बदल

बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यात अंशत: बदल करण्यात आला असून, महाविद्यालय , शालेय, आय टि आय, कृषी महाविदयालय अभियांत्रिकी व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेस व प्रवेशास नियुक्त अधिकारी, कर्मचारी , प्राध्यापक, विद्यार्थी यांना केवळ परीक्षेस व प्रवेशास उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येत आहे. तसेच मशागतीसाठी देखील मुभा देण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांना व संबंधितांनी सोबत ओळखपत्र ,नियुक्तीपत्र, आधारकार्ड ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व औषधालये २४ तास चालू राहतील. याचबरोबर पूर्वीच्या आदेशात ट्रॅक्टर संपूर्णत: बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले होते. त्यात अंशत: बदल करण्यात आले असून, केवळ शेती मशागतीसाठीच ट्रॅक्टरला मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये शासन नियमाप्रमाणे चालू राहतील. या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार येईल, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.

Web Title: Permission granted for educational courses and agricultural cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.