विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:27+5:302021-03-14T04:29:27+5:30
आठवडे बाजार बंद ; मात्र विक्रेत्यांची गर्दी बीड : काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रभाव असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील आठवडे ...

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
आठवडे बाजार बंद ; मात्र विक्रेत्यांची गर्दी
बीड : काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रभाव असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील आठवडे बाजार यात्रा, महोत्सवावर ३१ मार्चपर्यंत निर्बंध आणले गेले आहेत. दरम्यान, गेवराई नगरपरिषदेने आवाहन करूनही शहरात भाजी विक्रेत्यांनी मात्र या आवाहनाला प्रतिसाद न देता भाजी विक्रीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. बुधवारचा आठवडे बाजार रद्द केल्याचे दोन दिवस आधीच ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर केले होते. त्यामुळे बाजार ठिकाणी न बसता विक्रेत्यांनी इतर ठिकाणी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
नेत्रधाम परिसरात गार्डनमध्ये वृक्षारोपण
बीड : शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा. सावरकर कॉलनी येथे दत्त मंदिर गार्डन येथे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण उपक्रमात युथ फॉर फ्युचरचे राधेय बाहेगव्हाणकर, विवेक कुलकर्णी, ओंकार पुराणिक, रितेश डावकर, आशुतोष काळे, शुभम सारडा, यश करवा, मृणाली कुलकर्णी या मुलामुलींनी सहभाग घेत झाडांच्या संगोपनाचे वचन दिले. तसेच रोटरी मिडटाऊनने गार्डनमध्ये राजेश बंब यांनी ४ सिमेंट बाक दिले. याप्रसंगी नगरसेवक बाबूराव दुधाळ, सनी वाघमारे, दिनेश लोळगे, दत्ता व्यवहारे, किशोर चव्हाण उपस्थित होते.
दिंद्रूड येथे कंकय्या महाराज जयंती
दिंद्रूड : येथील ग्रामपंचायतीमध्ये वीरशैव कंकय्या महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रा.पं. सदस्य रामेश्वर उबाळे, नारायण चांदबोधले, अतुल चव्हाण, समता परिषदेचे राजाभाऊ कटारे, राकाँ अल्पसंख्यांकचे आकील, मधुकरराव देशमाने, बाबासाहेब जाधव, भारत गौंडर, आजीम शेख, जयंतीचे आयोजक राम चांदबोधले, कानडे अप्पा, हनुमान सोळंके, जावेद पठाण आदी उपस्थित होते.