वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:00+5:302021-07-08T04:23:00+5:30

साहित्यिक व कलावंत विविध विषयांवर लेखन करून साहित्यांची निर्मिती करत असतात, तसेच लोककलावंतदेखील विविध प्रकारच्या कलेचे विचार मंचावर सादरीकरण ...

Pay honorarium to older writers and artists | वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन द्या

वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन द्या

साहित्यिक व कलावंत विविध विषयांवर लेखन करून साहित्यांची निर्मिती करत असतात, तसेच लोककलावंतदेखील विविध प्रकारच्या कलेचे विचार मंचावर सादरीकरण करून नागरिक व समाजाचे प्रबोधन करण्याचे महान कार्य करीत असतात. साहित्याचे लेखन आणि कलेचे सादरीकरण करताना साहित्यिक व कलावंतांनी वृद्धावस्था गाठली असून, त्यांना आता हे काम करणे अशक्य झाले आहे. राज्य शासनाने १९५५ पासून मानधन देणारी योजना कार्यान्वित केली असून, अ, ब व क श्रेणीतील अशा निकषपात्र वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते; परंतु मागील तीन महिन्यांपासून साहित्यिक व कलावंतांना मानधन अदा करण्यात आले नसल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यांना मानधन उपलब्ध करून दिलासा देण्याची मागणी दगडू लोमटे यांनी केली आहे.

Web Title: Pay honorarium to older writers and artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.