शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:48 AM

वाळूचे प्रकरण आले अंगलट

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांनी केले होते कामबंद विभागीय आयुक्तांचे आदेश  

बीड : पाटोदा तहसीलदार रूपा चित्रक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यावर चित्रक यांना निलंबित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. तहसीलदार रूपा चित्रक दुसऱ्यांदा निलंबित झाल्या आहेत. यापूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कार्यरत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. 

रूपा चित्रक यांनी पाटोदा तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांचे अनेक निर्णय वादात सापडले होते. चारा छावणी सुरु असताना शासकीय दस्ताऐवजांवर मागील तारखेत स्वाक्षरी करणे, कार्यालयात हजर न राहणे, वरिष्ठांच्या नोटिशीला उत्तर न देणे, कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे, पदाचा गैरवापर करुन तलाठ्यांच्या बदल्या करणे, शासकीय वाहनावर खासगी चालक ठेवणे, शासकीय योजनांच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या वाळू बाबत जिल्हाधिकारी बीड व जालना यांचे आधिकार वापरुन बेकायदेशीर परवानगी देणे, यासह विविध कारणांमुळे त्यांच्या निलबंनाचा व  विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे पाठवला होता. चित्रक यांना त्यांचे खुलासा मांडण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आदेशात नमुद केले आहे. 

दरम्यान पाटोदा तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते, ही कारवाई योग्य नसल्याची भूमिका घेत जिल्हाभरात महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक समितीची स्थापन करुन चौकशी केली होती. त्यानूसार सर्व अहवाल विभागीय कार्यालयात पाठवून निलंबन तसेच विभागीय चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे रुपा चित्रक यांना दोषी धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी होणार आहे. 

वाळूचे पैसे भरून घेतलेच नाहीततालुक्यातील पिंपळवाडी, बानेवाडी, नाळवंडी याठिकाणी झालेल्या उत्खनानाचा महसूल भरून घेतला नाही. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अवैधरीत्या वसुली केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी पकडलेले वाळूचे टिप्पर पदाचा गैरवापर करुन सोडायला सांगणे, यासह इतर काही ठिकाणी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला होता.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडsandवाळूTahasildarतहसीलदारsuspensionनिलंबन