पाटोदा बे. माध्यमिक विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:27+5:302021-03-13T04:58:27+5:30
प्रमुख व्याख्याते म्हणून गजानन जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बांगर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व ...

पाटोदा बे. माध्यमिक विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम
प्रमुख व्याख्याते म्हणून गजानन जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बांगर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले व संस्थेच्या संस्थापिका लोकनेत्या काकूं यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच व्याख्याते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर दहावीचे विद्यार्थी शुभम गोंदवले, सुखदा तुपे, देवयानी जाधव या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ शिक्षक लांडगे, प्रमुख पाहुणे बांगर अनेक उदाहरणांच्या माध्यमातून विचार व्यक्त केले. प्रमुख व्याख्याते गजानन जाधव यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा अनेक उदाहरणांच्या माध्यमातून दिला. मुख्याध्यापक मस्के यांनी अध्यक्षीय समारोपावेळी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या विचारांचा धडा घेऊन आजच्या कालखंडामध्ये शिक्षणाचे महत्त्व जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. चोरमुले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
===Photopath===
110321\11bed_13_11032021_14.jpg
===Caption===
पाटोदा बे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेलखंडी पाटोदा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम बुधवारी पार पडला.