शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाबाहेरील झाडाला रुग्णाने गळफास घेतला, खिशातून मोबाइल पडला अन् जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:39 IST

सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगद वर उचलल्याने वाचले प्राण,मात्र प्रकृती गंभीर असल्याची माहिती

बीड : उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अपघात विभागाच्या समोरील झाडाला रुमालाने गळफास घेतला. लटकताच खिशातील मोबाइल खाली पडला अन् लोकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्याला वाचविले. त्यानंतर अपघात विभागात दाखल करून उपचार केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला. गळफास घेण्याचे कारण मात्र, समजू शकले नाही.

नामदेव रगडे (अंदाजे वय ४०, रा. वांगी, ता. बीड) असे या रुग्णाचे नाव आहे. नामदेव हे शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात आले. अपघात विभागासमोरच जुने वडाचे झाड आहे. त्या ठिकाणी ते काही वेळ थांबले. याच झाडाखाली रुग्णांचे नातेवाईक जेवण करतात. तसेच सावली असल्याने गप्पा मारत असतात. त्यामुळे येथे कायम गर्दी असते. ही गर्दी कमी होताच नामदेव यांनी संरक्षक भिंतीच्या बाजूने झाडावर चढले. आपल्या गळ्यातील भगवा रूमाल फांदीला बांधला. फांद्यामुळे ते कोणाला दिसले नाही. त्यानंतर गळफास लावून लटकताच ते थोडे आडवे झाले आणि वरच्या खिशातील मोबाइल खाली पडला. बाजूच्या लोकांनी जाऊन पाहिल्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगद वर उचलले. इतर लोकांनी मदत करून गळ्याचा फास काढत त्यांना खाली उतरवत अपघात विभागात दाखल केले. त्यांच्यावर अपघात विभागातच उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

सीएस, एसीएसचीही धावगळफासाची माहिती समजताच ऑनलाइन बैठकीत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शहाणे, डॉ. एल.आर. तांदळे, डॉ. हनुमंत पारखे यांनी धाव घेतली. अपघात विभागातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे रगडे यांना जीवदान मिळाले. काही वेळ अपघात विभागातच उपचार केल्यानंतर आयसीयू विभागात दाखल करू, असे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड