पॅसेंजर रेल्वे आता एक्स्प्रेस; सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:02+5:302021-08-28T04:37:02+5:30
संजय खाकरे/ लोकमत न्यूज नेटवर्क परळी : रेल्वे प्रशासनाने कोरोना स्थितीत तोट्यात जाऊ नये म्हणून पॅसेंजर रेल्वे गाड्या एक्स्प्रेसमध्ये ...

पॅसेंजर रेल्वे आता एक्स्प्रेस; सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार
संजय खाकरे/
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : रेल्वे प्रशासनाने कोरोना स्थितीत तोट्यात जाऊ नये म्हणून पॅसेंजर रेल्वे गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या परळी रेल्वे स्टेशनमार्गे एकूण सहा रेल्वे गाड्या स्पेशल एक्स्प्रेस म्हणून धावत आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना तिकीट पूर्वी कमी होते. परंतु, आता या गाड्या एक्स्प्रेस झाले असल्याने प्रवाशांना तिकीट मात्र तिप्पट जादा मोजावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांना एक्स्प्रेस रेल्वे गाडी कशी परवडणार? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी मार्गेच्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सहा पॅसेंजर रेल्वे गाड्या परळी रेल्वे स्टेशनमार्गे धावत आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना एक्स्प्रेस विशेष रेल्वे गाडी म्हणून रेल्वे प्रशासनाने संबोधले आहे. परंतु, या रेल्वेच्या गाड्यांना जास्त तिकीट आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे.
...
तोट्यातील कारणे..
अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे.
कोरोनापूर्वी औरंगाबाद -हैदराबाद रेल्वेने परळी- हैदराबादला पॅसेंजर गाडीने स्लीपर क्लासला १२० रुपये तिकीट होते. आता स्पेशल रेल्वे असलेल्या औरंगाबाद- हैदराबादला परळीहून ३८५ रुपये तिकीट प्रवाशांना मोजावे लागत आहेत.
परळीहून पॅसेंजरने गंगाखेड येथे जाण्यासाठी १० रुपये तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे होते. परंतु, आता तीस रुपये मोजावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
...
जवळच्या प्रवासासाठी अत्यल्प दरात उपलब्ध असलेल्या पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करून एक्स्प्रेस चालविणे म्हणजे रोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ आहे. गंगाखेडला जाण्यासाठी पॅसेंजरला १० रुपये, तर एक्स्प्रेसला तीनपट म्हणजे ३० रुपये मोजावे लागत आहेत.
-अश्विन मोगरकर.
...
‘स्पेशल’च्या नावाखाली काही पॅसेंजर गाड्या अनेक पटीने तिकीट वाढवून ‘सुपर’ म्हणून पूर्वीप्रमाणे तशाच चालवीत आहेत. ही प्रवाशांची लूट करणे रेल्वेने आता थांबवायला हवे. औरंगाबाद-हैद्राबाद (स्पेशल एक्स्प्रेस) नियोजित वेळेपेक्षा स्पेशल म्हणून तीन तास उशिराने (सर्व थांबे घेत) धावत आहेत. त्याचा रोजच प्रवाशांना संताप होत आहे.
- शेखर फुटके, परळी.
....
बीड जिल्ह्यातून सध्या जाणाऱ्या पॅसेंजर
औरंगाबाद- हैदराबाद.
हैदराबाद-औरंगाबाद
हैदराबाद -पूर्णा
पूर्णा-हैदराबाद
परळी -आदिलाबाद
आदिलाबाद -परळी.
...
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
परळी- अकोला.
अकोला परळी.
पंढरपूर-निजामाबाद
निजामाबाद -पंढरपूर
परळी- पूर्णा
पूर्णा - परळी
परळी- मिरज
मिरज परळी.
....