बीड/गेवराई : जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गेवराई पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एकूण ५० पेक्षा जास्त मोटारसायकली आणि त्यांचे सुटे भाग असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेवराई शहरात आणि परिसरात मागील दोन महिन्यांपासून वाहन चोरीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयित आरोपींवर पाळत ठेवली. ५ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी अचूक नियोजन करून ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ही टोळी दुचाकी चोरी केल्यानंतर अवघ्या दोन तासांत तिचे सर्व सुटे भाग (पार्ट) वेगळे करून विल्हेवाट लावत होती, असे तपासातून समोर आले आहे.
यांना ठोकल्या बेड्यासय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन (वय ३१, रा. छत्रपती संभाजीनगर एम.आय.डी. शहा शौकत कॉलनी), सय्यद इमदाद हुसेन अर्शद हुसेन (वय २२, रा. मासूम कॉलनी, मोमीनपुरा रोड, बीड), शेख आसेम शेख मझर (वय ३२, रा. टिपू सुलतान चौक, नेकनूर, जि. बीड) अशी पकडलेल्या तीन आरोपींची नावे असून, एकजण अद्याप फरार आहे.
चार जिल्ह्यांतून दुचाकी पळविल्यापोलिसांनी या कारवाईत अंदाजे २५ लाख रुपये किमतीच्या १७ पूर्ण मोटारसायकली, १६ सांगाडे आणि ३० इंजिन असा एकूण ५० पेक्षा जास्त वाहनांचा मुद्देमाल जप्त केला असून, या दुचाकी बीडसह छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून चोरी केल्याची शक्यता वर्तवली आहे.
या पथकाने केली कामगिरीही कामगिरी गेवराईचे पोलिस निरीक्षक किशोर पवार, सपोनि दीपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, पोउपनि प्रदीप आढाव, मपोउपनि निशिगंधा खुळे, श्रेपोउपनि सुरेश पारधी, श्रीमंत उबाळे, रवींद्र राऊत, अशोक हबर्डे, कल्याण राठोड, घोलप, राजू सांगळे, ऋषी पोटे आणि होमगार्ड महादेव पाटोळे यांनी केली आहे.
Web Summary : Police in Gevarai busted an interstate bike theft ring, recovering over 50 vehicles and parts worth ₹25 lakhs. The gang dismantled stolen bikes within two hours, selling the parts. Three arrested; investigation ongoing across four districts.
Web Summary : गेवराई पुलिस ने अंतरराज्यीय बाइक चोरी गिरोह का भंडाफोड़ किया, ₹25 लाख से अधिक के 50 से अधिक वाहन और हिस्से बरामद किए। गिरोह चोरी की बाइकों को दो घंटे के भीतर नष्ट कर देता था। तीन गिरफ्तार; चार जिलों में जांच जारी।