दिंद्रुड येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:06+5:302020-12-29T04:32:06+5:30

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अभिनव पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर, उमरी व अभिनव पब्लिक स्कूल, दिंद्रुड ...

Participation of 55 contestants in the state level oratory competition at Dindrud | दिंद्रुड येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग

दिंद्रुड येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अभिनव पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर, उमरी व अभिनव पब्लिक स्कूल, दिंद्रुड यांच्या संयुक्त विद्यमाने २७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून ५५ स्पर्धक या स्पर्धेत उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित या स्पर्धेच्या प्रथम सत्राचे उद्घाटन ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज आनंदकर, प्रा. डाॅ. रमेश गटकळ, सुशेन महाराज नाईकवाडे, दत्तात्रय वाळसकर, ज्ञानेश्वरी अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल फुलगे, वैजनाथ घायतिडक, बंडु खांडेकर, संतोष स्वामी, ज्ञानेश्वर डोईजड यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘भंग झालेल्या समाजाला अभंगाची गरज, लागलेली भूक, फाटलेला खिसा आणि तुटलेले मन, युवकांचे प्रेरणास्थान शरद पवार, मातीशी नाळ जोडणारा लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, मोर्चे आंदोलन, कायदा किती अंत पाहणार शेतकरी राजांचा, करुन जावे बरेच काही दुनियेतून’ हे स्पर्धेचे विषय होते.

ज्ञानेश्वर महाराज सोळंके, गणेश घायतिडक, गणेश गटकळ, अक्षय देशमुख, कृष्णा शेंडगे, गजानन साबळे, दत्ता कुरे, गणेश लाटे, बाळकृष्ण कटारे, अभिमान पारेकर, वैभव अकुसकर, जीवन नखाते, अशोक जगदाळे, आकांक्षा नवले, श्रुती जाधव, रिद्धी देशमुख यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.

या स्पर्धेत सतीश कांबळे, गणेश लोळगे विभागून प्रथम क्रमांक, तेजस्विनी पांचाळ, हर्षवर्धन अलासे विभागून द्वितीय, तेजस्विनी केंद्रे, आशिष साडेगांवकर विभागून तृतीय आले. जालिंदर जगताप, साईनाथ महादवाड, मंदार लटपटे, परमेश्वर घोडके, पल्लवी हाके यांना उत्तेजनार्थ तसेच मंजुश्री घोणे, वैष्णवी साबळे, स्नेहल कदम, विद्या कुंभार, अर्जुन लगड, सुशील घाटके यांना विषेश उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रा. संतोष विरकर व निखील नगरकर हे परीक्षक होते.

Web Title: Participation of 55 contestants in the state level oratory competition at Dindrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.