भगव्या सप्ताहात सहभागी व्हा- खांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:44 IST2018-01-17T00:44:25+5:302018-01-17T00:44:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक कार्यांच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन नवनियुक्त ...

भगव्या सप्ताहात सहभागी व्हा- खांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक कार्यांच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन नवनियुक्त जिल्हाप्रमुखांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन ठरवले होते. या भगवा सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी भवानवाडी येथे केले.
१६ ते २६ जानेवारीपर्यंत या सप्ताहाचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे.
१६ जानेवारी रोजी बीड तालुक्यातील भवानवाडी येथून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी या सप्ताहाचे उद्घाटन केले.
बीड तालुक्यातील भवानवाडी येथे शालेय साहित्य वाटप, रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकवाच्या कार्यक्र माने या सप्ताहाची सुरु वात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, नारायण काशीद, बाळासाहेब अंबुरे, उल्हास गिराम, किशोर जगताप, नितीन धांडे, जयसिंग मामा चुंगडे, गुंडिबा नवले, राहुल साळूंके, प्रा शिवराज बांगर, बाळासाहेब नागटिळक, बबन पवार, सुनील सुरवसे, आदिनाथ भांडवले, बाबू करांडे, आबासाहेब आगलावे, सरपंच नागोराव बोरगे, प्रवीण मुळूक, पंडित खांडे, माजी सरपंच उर्मिला जगताप व इतर शिवसैनिक उपस्थित होते.