संघर्षातून कुटुंबाला उभारणी देणाऱ्या महिलांचा परळीत सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST2021-03-09T04:36:08+5:302021-03-09T04:36:08+5:30
येथील पोलीस ठाण्यासमोर गंगाबाई पांडुरंग धाकपाडे या महिलेने चहाची टपरी टाकून २० वर्षांपासून चहाचा व्यवसाय करत आपल्या तीन ...

संघर्षातून कुटुंबाला उभारणी देणाऱ्या महिलांचा परळीत सन्मान
येथील पोलीस ठाण्यासमोर गंगाबाई पांडुरंग धाकपाडे या महिलेने चहाची टपरी टाकून २० वर्षांपासून चहाचा व्यवसाय करत आपल्या तीन मुलींचे विवाह केले व आजही आपले कुटुंब सांभाळत आहेत. मोंढा मार्केट परिसरातील मीना रोशन खरे या महिलेने पतीच्या निधनानंतर पशुधनाचा साज विकून आपल्या पाच लेकरांचा सांभाळ करत सर्वांचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये एका मुलीने एम.बी.ए. शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचा सामना करून त्या कुटुंबाचा आधारवड ठरल्या. त्यांच्या कार्याला सलाम करत सोमवारी महिला दिनाचे औचित्य साधून न. प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी हा सन्मान केला. यावेळी परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, जमादार भास्कर केंद्रे, संभाजी मुंडे, सामाजिक कार्यकर्ते भागवत कसबे, महादेव गीत्ते आदी उपस्थित होते
===Photopath===
080321\img-20210308-wa0477_14.jpg