शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:06 IST

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले.

परळी (बीड) : सलग दुसऱ्या दिवशीही  परळी येथील बाजारपेठ बंद आहे. वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मंगळवारी तीन वाजता काही कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार परळीची बाजारपेठ दुपारपासून बंद होती. आज बुधवारी, दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडलेली नव्हती. शहरातील आडत बाजारपेठ ,किराणा लाईन मेन रोड, राणी लक्ष्मीबाई टावर ,नेहरू चौक, स्टेशन रोड व अन्य ठिकाणची दुकाने बंद असल्याचे दिसून आली. काही ठिकाणचे औषध दुकाने चालू होती. शहरातील हॉटेल्स ही बंद आहेत.

दरम्यान, वाल्मीक कराड यांच्या पांगरी गावात बुधवारी सकाळी पांगरी कॅम्प येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील 5 समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. वाल्मीक कराड यांना न्याय द्यावा व त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी ग्रामस्थ ही रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. 

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले. परळीतील चार जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला तर दोन ठिकाणी टायर जाळून सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. बुधवारी सकाळी पांगरी जवळील पांगरी कॅम्प येथे असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर पांगरी गावातील मारुती आश्रुबा मुंडे, संदिपान कुटेवाड, मोहन पाचंगे, राजाभाऊ मुंडे, मुंजाजी काटोळे हे कार्यकर्ते चढले. वाल्मीक कराडला न्याय द्या, अशा घोषणा सुरू केल्या. तसेच पांगरी व पांगरी कॅम्प येथील ग्रामस्थ ही रस्त्यावर आले असून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.

आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याचा दावापरळी येथील व्यापारी बुधवारी सकाळी एकत्र आले. यावेळी एक व्यापारी म्हणाला, आमदार सुरेश धस यांनी परळी शहराची विनाकारण बदनामी केली आहे. आम्ही आज आणि काल स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी