पार्किंग कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:09+5:302021-02-05T08:26:09+5:30
नियमांची एैशीतैसी अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. ...

पार्किंग कोलमडली
नियमांची एैशीतैसी
अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय
बाजारतळ दुरुस्त करा
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
मोबाईल रेंज मिळेना
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करुनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. रेंज मिळण्यासाठी दुरूस्तीची मागणी आहे.
अवैध वाहतूक
अंबाजोगाई : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. जवळपासच्या खेडेगावांना बस वाहतूक सुरू झाली नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीवरच नागरिकांचा प्रवास सुरू आहे.