जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गुरुजनांचा पालकांच्या हस्ते सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:37+5:302021-08-18T04:39:37+5:30
पोहनेर येथील विद्यार्थी पालकांच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिक्षकांचा सन्मान सोहळा छोटेखानी साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राजुरकर ...

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गुरुजनांचा पालकांच्या हस्ते सत्कार
पोहनेर येथील विद्यार्थी पालकांच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिक्षकांचा सन्मान सोहळा छोटेखानी साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राजुरकर यांचा सत्कार रामेश्वर काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोकाटे, पुरी, आण्णा, सिरसाट, काकडे, बाजगीर,जाधव यांचा देखील पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजुरकर म्हणाले की, पोहनेर गावकऱ्यांनी केलेला शिक्षकांचा सन्मान सोहळा आगळा -वेगळा सन्मान सोहळा आहे. असा हा सन्मान सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवतोय. या सन्मानाने आता आमची अधिकच जबाबदारी वाढली आहे.
विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी गुरुजनांचा सन्मान करणे गावकऱ्यांचे कर्तव्य आहे,आसे आपल्या प्रास्ताविकात पोहनेर गावचे शिक्षण प्रेमी प्राध्यापक महेश खोसे यांनी देखील आपले मत मांडले. तसेच शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
170821\17bed_3_17082021_14.jpg
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गुरुजनांचा पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.