मरावाठवाड्यात परभणीचा मृत्यूदर सर्वाधिक ३.९८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:07+5:302021-01-10T04:26:07+5:30
बीड : मराठवाड्यासह राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनामुळे बळी ...

मरावाठवाड्यात परभणीचा मृत्यूदर सर्वाधिक ३.९८ टक्के
बीड : मराठवाड्यासह राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक मृत्यू हे परभणी जिल्ह्यात झाले असून याचा टक्का ३.९८ एवढा आहे. तसेच एकूण मराठवाड्याचा मृत्यूदर २.९५ टक्के असून रिकव्हरी रेट ९५.७२ टक्के आहे. हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.६७ टक्के रिकव्हरी रेट आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत १३ लाख ७५ हजार २३२ लोकांची चाचणी करण्यात आली. पैकी आरटीपीसीआरच्या ५ लाख ४२ हजार ९३५ तर ॲन्टिजनेच्या ८ लाख ३२ हजार ३०७ चाचण्यांचा समावेश आहे. यात १ लाख ४८ हजार ५०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच आतापर्यंत ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यूदर हा परभणी जिल्ह्याचा आहे. तर सर्वात कमी १.५ टक्के हा हिंगोली जिल्ह्याचा आहे. तसेच रिकव्हरी रेटमध्ये हिंगोली जिल्हा अव्वल आहे. तर सर्वात कमी ९४.९४ टक्के हा बीडचा आहे. आरोग्य विभागासह, प्रशासनाने मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चार जिल्ह्यांचा मृत्यूदर ३ टक्क्यांपेक्षा जास्त
मराठवाड्यात चार जिल्ह्यांचा मृत्यूदर हा ३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे अहवालावरून समोर आले आहे. यात परभणी ३.९८ टक्के, बीड ३.२७, नांदेड ३.१६, उस्मानाबाद ३.४३ यांचा समावेश आहे. तर रिकव्हरी रेट हा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कोट
जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आढावाही घेतला जात आहे. यात लवकरच यश येईल.
डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आराेग्य अधिकारी, बीड
------
अशी आहे मराठवाड्याची आकडेवारी
जिल्हा
चाचणी
पॉझिटिव्ह
मृत्यू (%)
कोरोनामुक्त (%)
औरंगाबाद
४८०३८७
४६१५९
२.६२
९६.३७
जालना
१०३४६४
१३३४४
२.६४
९५.७१
परभणी
९१३८०
७६८०
३.९८
९५.०४
हिंगोली
५०९४६
३५७३
१.५
९६.६७
नांदेड
१८८६९०
२०९४६
३.१६
९५.२४
बीड
१८५०९७
१७०३९
३.२७
९४.९४
लातूर
१६५९८०
२३२५६
२.९२
९५.६९
उस्मानाबाद
१०९२८८
१६५०८
३.४३
९५.४६
एकूण
१३७५२३२
१४८५०५
२.९५
९५.७२