रामनामाच्या गजरात राजेवाडीमध्ये शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST2021-01-20T04:33:12+5:302021-01-20T04:33:12+5:30

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होत ग्रामस्थ रामनामात तल्लीन ...

Parade at Rajewadi in the wake of Ramnama | रामनामाच्या गजरात राजेवाडीमध्ये शोभायात्रा

रामनामाच्या गजरात राजेवाडीमध्ये शोभायात्रा

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होत ग्रामस्थ रामनामात तल्लीन झाले.

तालुक्यात दिनांक १५ जानेवारीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. रविवारी गावातीलच श्रीराम मंदिराचे संस्थापक बाळकृष्ण महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने राजेवाडी येथील ग्रामस्थांनी शोभायात्रा काढली. उपसरपंच रामेश्वर थेटे दीपक महागोविंद, महादेव थेटे, केशव कदम, मधुकर कदम, नामदेव महाराज मुळे, संजय पाठक, आश्रुबा नांदे महाराज यांच्या प्रयत्नातून या शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेमध्ये भगव्या पताका, प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमासह गावातील भजनी मंडळी, महिला मंडळी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक व तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला होता. कलशधारी चिमुकल्या विद्यार्थिनींनी या शोभायात्रेची रंगत वाढवली होती. ढोल, ताशा, वाजंत्रीसह तल्लीन झालेल्या तरुणांनी केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले. जागोजागी ही शोभायात्रेतील प्रभू रामचंद्र मूर्ती व प्रतिमेचे औक्षण करून पूजन करण्यात येत होते. शोभायात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रा.डॉ.उमेश साडेगावकर यांनी समाधान व्यक्त केले. दीपक महागोविंद यांनी आभार मानले. यावेळी निधी संकलन अभियानाचे नित्रुड मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. महेश देशमुख यांच्यासह समस्त राजेवाडी येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Web Title: Parade at Rajewadi in the wake of Ramnama